येरमाळा (साक्षी पावन ज्योत वृत्तसेवा) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञानोद्योग उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये विज्ञान विभागाचा एकूण 96.59 %निकाल लागला असून यामध्ये प्रथम कु.कवडे दिव्या मच्छिंद्र 83.50 %,द्वितीय कु. जाधव अस्मिता अशोक 74.17 %,तृतीय शेख शाहीद समीर-69.67 % व कला विभागाचा एकूण 84.33 % निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम कु.चोपडे गितांजली अशोक-71.00 %,द्वितीय ठाकूर तेजल मच्छिंद्र-68.67 % तृतीय क्रमांक कु.गवारे पूजा अनिल -68.33 % यांनी प्राप्त केला आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, शालेय समिती अध्यक्ष श्री. भाऊसाहेब बारकुल, प्रशालेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य पौळ एस. एल,पर्यवेक्षक कुंभार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज;४०० पोलीस,५०० होमगार्डसह व्यापक नियोजन
येरमाळ्यात येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवासाठी ६ मार्चला नियोजन बैठक
एनएमएमएस परीक्षेत ज्ञानोद्योग विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी; १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सत्कार