August 9, 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन मशीन पूर्ववत सुरू

  • धाराशिव (जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सिटीस्कॅन मशीन तांत्रिक कारणामुळे बंद झाली होती. तांत्रिक दुरुस्ती केल्यामुळे सिटीस्कॅन मशीन पूर्वत सुरू झाली आहे. सिटीस्कॅन मशीन आता पूर्ववत सुरू झाल्याने रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही. ही मशीन सुरू झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
error: Content is protected !!