August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.12 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 262 कारवाया करुन 2, 11, 150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार दि.12.05.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. 257 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 46 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 26,480 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)वाशी पो. ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- अंबरुषी खवऱ्या काळे, वय 65 रा. पार्डी ता. वाशी जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. आपल्या राहात्या पालामध्ये अंदाजे 1,490 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- दत्ता आबा शिंदे, वय 23 वर्षे, रा खैराट वस्ती पारधी पिढी ता. वाशी जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. हॉटेल स्वराजचे बाजूला दळवेवाडी फाटा येथे अंदाजे 1,620 ₹ किंमतीची 19 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे-अंकुश छन्नु पवार, वय 45 वर्षे, रा लोणखस पारधी पीडी ता. वाशी जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 1,300 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 2)कळंब पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सुरेखा बबलु काळे, वय 34 वर्षे, रा. डिकसळ पारधी पीडी वस्ती ता. कळंब जि. धाराशिव हे 18.05 वा. सु. जुनी दुध डेअरी जवळ पारधी वस्ती येथे अंदाजे2,500₹ किंमतीची 50 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 3)शिराढोण पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मोईन उर्फ बबलु मुन्शी कुरेशी, वय 29 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. राजकमल चिकन सेंटर च्या पाठीमागे अंदाजे 700₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 4)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-खंडेराव म्हाळप्पा गाडेकर, वय 32 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. रॉयल ढाबा जवळ अंदाजे 2,250 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 5)बेंबळी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- शेषेराव लिंबा राठोड, वय 45 वर्षे, रा. कनगरा ता. जि. धाराशिव हे 19.40 वा. सु. हॉटेल तुळजाभवानी लगत अंदाजे 3,000₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 6)भुम पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मालन लहु पवार, वय 35 वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता. भुम जि. धाराशिव या 18.10 वा. सु. आपल्या राहात्या पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 2,000₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 7)आनंदनगर पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-चंपा बाळु काळे, वय 60 वर्षे, रा. रामनगर सांजा धाराशिव ता. जि. धाराशिव या 20.40 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 8)उमरगा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-दत्तात्रय राम खंडागळे, वय 50 वर्षे, रा. हमीद नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. शिवाजी कॉलेजच्या ग्राउंडच्या पाठीमागे अंदाजे 2,500₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे-तानाजी बंकट बाचके, वय 45 वर्षे, रा. कोरेगाववाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. कोरेगाववाडी येथे अंदाजे 1,470 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 9)येरमाळा पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मोबिन अजिज मुलांनी, वय 27 वर्षे, रा. ध्नगर गल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे14.30 वा. सु. हॉटेल येडेश्वरीजवळ मंदीर परिसर येथे अंदाजे 6,850 किंमतीची 65 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.12.05.2024 रोजी 15.45 वा. सु. श्रीनिवास बारचे समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) अर्जुन दशरथ कांबळे, वय 22 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव, 2) समाधान मारुती बोडके, वय 32 वर्षे, रा. माळवाडी हडपसर पुणे हे दोघे 15.45 वा. सु. श्रीनिवास बारचे समोर टायगर जुगाराचे साहित्यासह एकुण 940 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.12.05.2024 रोजी 17.00 वा. सु. याटे कॉम्प्‌लेक्स उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) हरिश्चंद्र धनसिंग जाधव, वय 52 वर्षे, रा. वडकळबाळ ता. द. सोलापूर ह.मु. याटे कॉम्प्‌लेक्स उमरगा हे 12.05 वा. सु. याटे कॉम्प्‌लेक्स उमरगा जुगाराचे साहित्यासह एकुण 1,140 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) ईस्माईल हुसेन शेख, वय 37 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.12.05.2024 रोजी 14.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटोरिक्षा क्र एमएच 25 एके 1319 हा बंजारा बार समोर उमरगा येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)महेश दाते रा. उमरगा व इतर पाच इसम यांनी दि. 11.05.2024 रोजी 20.00 वा. सु. उमरगा येथे सुविधा हॉस्पीटलच्या गेटचे बाजूला रोडवर फिर्यादी नामे- अमृंत अनिल पाटील, वय 21 वर्षे, रा. कोळसुर क. ता. उमरगा जि. धाराशिव हे सुविधा हॉस्पीटलच्या गेटचे बाजूला उभा होते. दरम्यान आरोपी यांची मोटरसायकल स्लीप होवून खाली पडल्याने असता फिर्यादीने त्यांच्याकडे पाहील्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फरसीच्या तुकड्याने डोक्यात मारुन जखमी केले.व तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमृंत पाटील यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) भरत लिंबाजी गायकवाड,2) अजित भरत गायकवाड, दोघे रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 08.30 वा. सु. वडगाव लाख शिवार शेत गट नं 269/1 येथे फिर्यादी नामे-अरविंद महादेव गायकवाड, वय 51 वर्षे, रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जमीनीच्या वाटणीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई, मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा अनुज अरविंद गायकवाड हे भांडण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन घातक हत्याराने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरविंद गायकवाड यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 326, 323, 504, 506,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • ढोकी पोलीस ठाणे : मयत आरोपी नामे-सुरेश बाबुराव म्हेत्रे,(माळी), वय 60 वर्षे, व सोबत फिर्यादी नामे- महेश सुरेश म्हेत्रे, वय 30 वर्षे, त्यांचा भाउ तिघे रा. कळंब रोड शिराढोण, ता. कळंब जि. धाराशिव हे तिघे दि. 14.04.2024 रोजी 13.45 वा. सु. टाटा इंडीगो कार क्र एमएच 24 व्ही 0992 ने ढोकी कडून गोविंदपुरला जात असताना देशमुख यांचे इंग्लीश स्कुलसमोर अचानक म्हैस आडवी आल्याने म्हशीला वाचवण्यासाठी आरोपी सुरेश म्हेत्रे यांनी कार रोडचे साईडला घेतली असताना कार रोडच्या कडेच्या खड्ड्यात पलटी होवून अपघात झाला.या अपघातात आरोपी सुरेश म्हेत्रे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर फिर्यादी महेश म्हेत्रे व त्यांचा भाउ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश म्हेत्रे यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे : मयत नामे-अजंना गोरोबा पवार, उर्फ अंजना किरण शिंदे, वय 31 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव हे दि. 10.05.2024 रोजी 17.30 ते 17.45 वा. सु. ज्ञानदयोग उच्च माध्यमिक विदयालय येरमाळा पाठीमागील बाजूस एनएच 52 धाराशिव कडे जाणारे रोडवरुन स्कुटी क्र एमएच 25 एयु 4289 ही वरुन जात होते. दरम्यान आयशर टॅम्पो कृर पिबी 11 बीवाय 9213 चा चालक नामे- रणधिर सिंग सरदार सिंग, वय 49 वर्षे, रा. भंखरपुर तेह डेरा बसी जिल्हा पटियाला पंजाब यांनी त्यांच्या ताब्यातील आयशर टॅम्पो हा हायगई व निष्काळजीपणे चालवून अजंना पवार, शिंदे यांचे स्कुटीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अजंना पवार, शिंदे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या.तसेच नमुद आयशार टेम्पो चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात उपचार कामी घेवून न जाता अपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धनराज सुर्यकांत शिंदे, वय 38 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : मयत नामे-पंकज संजय वाघे, वय 30 वर्षे, व सोबत किरण शरद वैरागकर, वय 27 वर्षे, दोघे रा. बालाजी नगर शेकापुर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे दोघे दि.11.05.2024 रोजी 21.15 वा. सु. बावस्कर बिल्डींग जवळ एस वन हॉटेल समोरील सर्व्हीस रोडवर धाराशिव येथे मोटरसायकल क्र एमएच24 बीएन 1553 ही वरुन जात होते. दरम्यान महिंद्रा थार गाडी क्र एमएच 13 टीसी 175 चा चालक नामे- सुधाकर धानु चव्हाण रा. साखर कारखाना नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याच्या ताब्यातील महिंद्रा थार गाडी ही हायगई व निष्काळजी पणे रॉग साईडने चालवून पंकज वाघे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात पंकज वाघे हे गंभीर जखमी होवुन मयत झाले.तर किरण वैरागकर हे गंभीर जखमी झाले. तसेच नमुद महिंद्रा थार गाडीचा चालक हा जखमींना उपचार कामी दवाखान्यात न नेता अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेश मधुकर वाघे, वय 49 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव ह.मु. बालाजी नगर शेकापुर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • धाराशिव जिल्हा : एका गावातील एक 28 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) फेब्रुवारी ते दि. 06.03.2024 रोजी पर्यंत तीस लग्नाचे आमिष  एका 33 वर्षीय तरुणाने तीच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि. 12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-376, 376(2)(एन), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!