कळंब – सातेफळ ता.केज येथे नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली असून गेली वीस पंचवीस वर्षे छत्रपती शिवरायांचा फोटो आणि झेंडा मारुती मंदिरासमोर स्थापन करण्यात आला होता. त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवराय पुतळा निर्माण समितीची निवड करण्यात आली.या समितीमध्ये भूमिपुत्र वाघ,डॉ. भाऊसाहेब उगले, वैभव गरड,रंजित जगताप, रवी उगले, अजित वाघमारे,महावीर डोके याची एकमताने निवड करण्यात आली. घेण्यात आलेला निर्णय माहिती संकलन आणि प्रस्ताव तयार करणे. तो दाखल करण्याची मुख्य जबाबदारी. वैभव गरड आणि रणजित जगताप यांनी घेतली. वरील प्रमाणे एकमताने दोन निर्णय घेण्यात आले.सूत्रसंचालन आणि आभार महावीर डोके यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले