धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.10 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 245 कारवाया करुन 2,08,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.10.05.2024 रोजी 14.15 वा. सु. नळदुर्ग पो.ठाणे हद्दीत बसस्थानक जवळ पान टपरी समोर काटगाव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) सुनिल पांडुरंग गोरसे, वय 39 वर्षे, 2) सागर उर्फ प्रकाश अशोक पाटील, वय 27 वर्षे, दोघे रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे 14.15 वा. सु. बसस्थानक जवळ पान टपरी समोर काटगाव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.10.05.2024 रोजी 18.30 वा. सु. तेर येथे संत गोरोबा काका मंदीरा समोरील भरलेले यात्रा मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) अनिल रामा पवार, वय 35, रा. तेर ह.मु. काजळा पाटी ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. तेर येथे संत गोरोबा काका मंदीरा समोरील भरलेले यात्रा मध्ये चिमणीपाखर मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 510 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“मिरवणुकीमध्ये डॉल्बी डिजेचा आवाज ध्वनी तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून आदेशाचे उल्लंघन
करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अक्षय बलभिम साळुंके, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 17.00 ते 21.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे श्री. महाराणा प्रताप जयंती मिरवणुकी मध्ये लावलेले वाद्य हे पारंपारिक पध्दतीने किंवा पोलीसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे न लावता डॉल्बी डिजे लावून आदेशाचे उल्लघंन केले. तसेच लोकसेवक पो स्टे प्रभारी अधिकारी यांनी दिलेले सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीसचे आदेशाचे जाणीवपुर्वक अवज्ञा केली. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.सं. कलम-188, अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- शमशोद्दीन नसरोद्दीन काझी, वय 61 वर्षे, रा.तांबरी विभाग एसआरटी कॉलनी घर नं 28/14 धाराशिव ता. जि. धाराशिव हे त्यांच्या राहात्या घराला कुलूप लावून घटस्पोटीत पत्नी अंबाजोगाई येथे मयत झालेच्या आरोपामध्ये बीड कारागृह मध्ये असताना फिर्यादीचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 13.02.2024 रोजी 15.00 ते दि. 05.05.2024 रोजी 08.30 वा.पुर्वी तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे 49,100 ₹ किंमतीचे दागिने व टाईल्स फरशी जरमनचे मोठे पातेले घरावरती टाकायचे पत्रे असा एकुण 62,100₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शमशोद्दीन काझी यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 457, 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बिलाल ईस्माईल शेख, वय 30 वर्षे, रा. उजनी रोड पाण्याच्या टाकीजवळ बेंबळी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीचीमोटरसायकल एचएफ कंपनीची काळ्या रंगाची क्र एमएच 25 एक्यु 5123 ही दि.08.05.2024 रोजी 13.00 ते 13.15 वा. सु.सांजा रोड डॉ. पोलावर दवाखाण्याच्या बाजूस धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बिलाल शेख यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)विनायक विश्वास इंगळे, रा. वेताळ नगर तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 12.00ते 12.30 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर येथील ओम वडापाव दुकानासमोर आंबेडकर चौक येथे जाणारे रोडवर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-प्रमोद लक्ष्मण दाणे, वय 32 वर्षे, रा.जिजामाता नगर, मारुती मंदीराजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन डिझेल अंगावर टाकुन काडीपेटीतील काडी ओढून आग लावून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रमोद दाणे यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 307, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)बजरंग उर्फ नारायण मारुती ताकमोडे, 2) सतिश बापू हगारे,3) दत्ता मारुती ताकमोडे, 4) गोपीनाथ मधु हगारे, 5) सधु बापु जेकटे, 6) बिरुदेव भानुदास जेकटे, 7) काशिनाथ मधु हगारे, 8) बाळु लक्ष्मण शिंगाडे, 9) नाना वायसे सर्व रा. ताकमोडवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 08.05.2024 रोजी 20.30 वा. सु. ताकमोडवाडी येथे फिर्यादी नामे- शेषनाथ लिंबा भोसले, वय 39 वर्षे, रा. ताकमोडवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुझा चुलत भाउ नकुल भोसले याची पत्नी पळून गेल्याची केस पोलीस स्टेशनला करायची नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी मनिषा व मुली स्वाती, नेहा चुलत भाउ नकुल भोसले हे भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेषनाथ भोसले यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 149, भा.दं.वि.सं. अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(2)(व्हिए), 3(1) (आरएस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)विकास विठ्ठल इंगळे, 2) मयुर विकास इंगळे, रा. बोरवंटी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 13.30 वा. सु. बोरवंटी शेत शिवार येथे फिर्यादी नामे- अशोक विठ्ठल इंगळे, वय 56 वर्षे, रा. बोरवंटी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक इंगळे यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)बालाजी शिवपाल रजपुत, 2) नितीन बालाजी रजपुत, 3) शिवपाल माणिक रजपुत सर्व रा. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 07.05.2024 रोजी 22.30 वा. सु. उत्तर जेवळी येथे फिर्यादी नामे- मंगल दत्ता रजपुत, वय 35 वर्षे, र. उत्तर जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव यांना शेत वाटणीचे कारणावरुन शिवीगाळ करुन काठीने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीची सासु या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मंगल रजपुत यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी