August 9, 2025

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या मुळ गाव असणाऱ्या कळंब येथील मंदिराला तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे लिंगायत समाजाचे स्वप्न पूर्ण झाले. असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी केले आहे.
  • कळंब शहरातील सोनार लाईन येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या मंदिर गाभारा लोकसहभागातून बांधकाम करण्यात येणार असून याचे भुमीपुजन व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली आहे.
    यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे, शिवसेनेचे सागर मुंडे, माजी नगरसेवक निलेश होनराव, शिशिर राजमाने, शिवाजीराव लोखंडे, विलास मिटकरी, प्रकाश भडंगे, डॉ. सुनील थळकरी आदी उपस्थित होते. यावेळी
    पुढे बोलताना माजी उपनगराध्यक्ष मुंदडा म्हणाले की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी मुळचे कळंब चे असून शके १४४२ मध्ये त्यांचा जन्म आजोळी नेकनुर (जि. बीड) येथे झाला होता. ते कुटुंबा समवेत मुळ गावी कळंब येथे वास्तव्यास होते. वीरशैव समाजासहीत तमाम जाती धर्मात ते वंदनीय होते. त्याचप्रमाणे आद्य वीरशैव किर्तनकार म्हणून त्यांची गणना होती. अभंग व समाज प्रबोधन मध्ये त्यांचे नाव मोठे आहे. सदरील ठिकाणी अनेक दिवसांपासून कळंब शहरातील संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या मंदिरास तिर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मागणी होती. पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी तिर्थ क्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्याच बरोबर तीन कोटींचा निधी मंजूर केला असून एक कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे लिंगायत बांधवांचे मन्मथ स्वामी यांच्या मंदिराचे स्वप्न पुर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच समाजात काल आणि उद्या सर्वांनी एकमेकांच्या मागे उभा राहुण पाठबळ देण्याची गरज आहे. लिंगायत समाजाने एकजुट ठेवली तर कोणत्याही कामाला अडथळा निर्माण होणार नाही. असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी केले आहे. याप्रसंगी एमबीबीएस झालेल्या डॉ. शिवानी शिवराज पाटील हिचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण कापसे, शिवकुमार राजमाने, नाना थळकरी, शितलकुमार घोंगडे, बालाजी चिंचकर, नाना शिंगणापूरे, शैलेश स्वामी, गजानन शिंगणापूरे, ओंकार मुंडे, सुमित घोंगडे, रवि कथले यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन निलेश होनराव यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने लिंगायत बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!