August 9, 2025

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बजावत आहेत घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून धाराशिव लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच ज्याना घराच्या बाहेर पडता येत नाही व मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्के अपंगत्व आलेले दिव्यांग नागरिक त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी शेती, वस्ती, व निवासस्थानी जाऊन तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केलेल्या मतदान कक्षात गोपनीयता राखून विशेष ग्रह भेट पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे दिनांक २ मे रोजी कळंब येथील कसबा पेठेतील ८५ वर्षावरील वृद्ध मतदार इंदुबाई भालचंद्रराव देशमुख वय ८७ यांनी पोस्टल मतदान द्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजाविला मतदानाची गोपनीयता राहावी यासाठी तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले होते हे मतदान घेण्यासाठी पथके तयार करण्यात आले असून दिनांक २ ते ५ मे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे ज्या मतदारांनी यासाठी दिनांक १२ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान नोंदणी केली आहे आशा मतदाराचे मतदान घेतले जात आहे या पथकात एस. एस. वायकर (क्षेत्रीय अधिकारी) जे.पी. मुंडे (क्षेत्रीय अधिकारी ) एस .ए. त्रिभुवन (मतदान केंद्राध्यक्ष) एस. के. राजहंस (सहायक मतदान अधिकारी ) सचिन खाडे (सूक्ष्म निरीक्षक ) जाधव ( पो. हे. कॉ.) व्हिडिओग्राफर अनिल पवार ,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नाथाडे दशरथ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे.
error: Content is protected !!