August 9, 2025

साजन विशाल यांच्या प्रबोधनपर भीमगीतांना प्रतिसाद

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कळंब येथील नगर परिषद शाळेच्या मैदानावर भीम फाउंडेशन व कल्पनानगर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध गायक, संगीतकार साजन-विशाल या कलाकारांच्या भीम बुद्धगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होती. ज्येष्ठ नेते डी.जी.हौसलमल, संस्थापक अध्यक्ष विपीन हौसलमल,जयंती समितीचे अध्यक्ष राहुल हौसलमल यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यास उद् घाटक म्हणून कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक रवी नरहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतपाल बनसोडे,
    संजय बनसोडे, अमर गायकवाड, प्रणव नरहिरे, संदीप सोनवणे यांची उपस्थिती होती.
    रात्री कार्यक्रमास सुरुवात होताच पावसाचे आगमन झाले. मात्र, या वातावरणातही गायक, संगीतकार साजन विशाल यांनी ‘लय मजबूत भीमाचा किल्ला’ यासह ‘मेरे भीम की है दुनिया दिवाणी’ अशा विविध सुमधुर भीमगीतांचे सादरीकरण केले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज रणदिवे, सोनू गाडे, विक्रम जोगदंड, करण साळुंखे,आकाश चव्हाण,अल्ताफ मिर्झा, बाळासाहेब खापे,प्रतीक बनसोडे, प्रबुद्ध बनसोडे,अभिलाष बनसोडे, वैभव गायकवाड, हर्षवर्धन गायसमुद्रे, बाळासाहेब हौसलमल, फहाद चाऊस, आकाश बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!