लातूर (दिलीप आदमाने ) – महाराष्ट्रातील ज्येष्ठ राज्यशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त त्यांचा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न होणार आहे. ज्येष्ठ इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शुभहस्ते विचारशाला लोकशाही विशेषांक आणि प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या गौरवांकाचे विमोचन शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी सायं. ५.३० वा. शाहू मेमोरियल ट्रस्ट (मिनी हॉल), दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील ज्येष्ठ इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार तर प्रमुख वक्ते म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीचे निवृत्त प्रा. डॉ. गोपाळ गुरु, सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत किशोर बेटकीहाळ, इचलकरंजी येथील प्रबोधन प्रकाशन ज्योतीचे संपादक प्रसाद कुलकर्णी तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील माजी विभाग प्रमुख व कै. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. भारती पाटील आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील आणि द युनिक फाउंडेशन पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक घोटाळे यांनी केले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे