कळंब – संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातून भागवत भक्तांना उपमा ,अलंकार व दृष्टांत त्याच्या रूपाने भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या व सहज भाषेत उपलब्ध करून दिले आहे सातशे वर्षानंतरही याची उपयुक्तता कायम आहे.यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन व पारायण महत्वाचे आहे असे विचार प्रसिद्ध ज्ञानेश्वरी वाचक ह.भ.प महेश महाराज भोरे तेर यांनी दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करीत असताना व्यक्त केले दिनांक १६ एप्रिल २०२४ ते २२ एप्रिल २०२४ ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाची सांगता २२ एप्रिल रोजी होणार असून दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वरी ग्रंथ ,भागवत ग्रंथ व तुकाराम महाराज गाथा यांचे भव्य दिव्य मिरवणूक दिंडी प्रदक्षिणा होणार असून दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी सूर्योदय प्रसंगी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे याच बरोबर सकाळी १० ते १२ या वेळेत अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती निमित्त श्री ह भ प ज्ञान सिंधू संदीपान महाराज शिंदे पाटील अध्यक्ष परीक्षक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचे काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले