August 9, 2025

आज धाराशिव मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची तोफ धडाडणार

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
    महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी देखील मंगळवारी (दि.१६) उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, आज (शुक्रवारी)१९ एप्रिल रोजी त्या जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचा आखाडा आता चांगलाच रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनीही मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आज शहरात महायुतीच्या वतीने शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार असून, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही प्रमुख पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात असल्याने निवडणूक प्रचाराला आता जोर येणार आहे.
    पंतप्रधान मोदींसह ठाकरेची सभा उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
    दीर-भावजयमध्ये होणारी, एकाच कुटुंबातील पारंपारिक लढाई, राज्य आणि जिल्हा स्तरावर पक्ष बदलाचे झालेले निर्णय, यामुळे यावेळीची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि अन्य प्रमुख नेते येण्याची शक्यता आहे तर महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औसा येथे सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडवणीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत आदी नेत्यांच्या सभा होणार असल्याची चर्चा आहे
    याकडे लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!