धाराशिव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी घोषित केला आहे.तिसऱ्या टप्प्यात 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया 12 एप्रिलपासून सुरु झाली असून 19 एप्रिल हा नामांकनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.उमेदवाराने दाखल केलेले शपथपत्र व प्रतिशपथपत्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रासोबत दाखल होणारे शपथपत्र व प्रतिशपथपत्र जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच भारत निवडणूक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर नागरीकांना पाहण्यास उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य