August 9, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन

  • लातूर (दिलीप आदमाने )  – महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालक,पुणे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड आणि श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालय समितीच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन यवतमाळ येथील आंबेडकरी विचाराचे सामाजिक कार्यकर्ते दुर्वासराव गवई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर निर्मला गवई,उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, प्रा.संजय पवार,पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे,ग्रंथालय समिती प्रमुख कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, रासेयो डॉ.रत्नाकर बेडगे,डॉ. शिवप्रसाद डोंगरे,डॉ.मनोहर चपळे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. यशवंत वळवी, रमेश राठोड आणि कीर्ती मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सर्वप्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
    यानंतर मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते दुर्वासराव गवई म्हणाले की,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण भारतवासीयांसाठी अत्यंत मौलिक असे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथावर अपार प्रेम करणारे अभ्यासक व विचारवंत होते. त्यांनी ग्रंथासाठी राजगृह बंगला बांधल्याचे आपणास ज्ञात आहे असे ते म्हणाले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे म्हणाले की,महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे मराठवाड्यातील सहा शाखांमध्ये ज्ञानदान देणारे एक महत्त्वाचे महाविद्यालय असून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम महाविद्यालयातर्फे राबवले जातात. आज ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन ग्रंथालय सभागृहामध्ये ठेवण्यात आले आहे याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.
    अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई म्हणाले की,महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालय हे मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाचे ग्रंथालय असून येथे दोन लाखाच्यावर ग्रंथ संपदा आहे. यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन आज महाविद्यालयातील ग्रंथालयात संपन्न होत आहे याचा मला मनस्वी आनंद आला आहे. या ग्रंथोत्सवाचा महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि लातूर शहरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गिरी, केदार इटगे, गोरख पाखरे, रंगनाथ लांडगे, शुभम बिराजदार आणि संयम गवई यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!