August 9, 2025

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात संपन्न

  • लातूर (दिलीप आदमाने ) –
    महाराष्ट्र शासन, महाविद्यालय जयंती उत्सव समिती आणि समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा.संजय पवार,पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, प्रा.धोंडीबा भुरे, डॉ.आनंद शेवाळे, प्रा.रवींद्र सुरवसे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, प्रा.नागेश जाधव, प्रा. दत्ता करंडे, विनायक लोमटे, यशपाल ढोरमारे आणि योगिराज माकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला सर्वांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्ता करंडे यांनी केले.
    यावेळी उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, प्रा. शिवशरण हावळे, कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
    अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागेश जाधव यांनी केले तर आभार प्रा. धोंडीबा भुरे यांनी मानले
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी डावकरे, शुभम बिराजदार आणि संगीता वैद्य यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!