पालकर लिखित प्रतीक्षा जगण्याची या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
कळंब – सर्वांना अन्न धान्य पुरविणारा शेतकरी कर्जबाजारीमूळे आत्महत्या करतो,सरकार संवेदनशील नाही.सरकार आणि संवेदना एकत्र नांदू शकत नाही.शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमंत मिळत नाही.त्यामुळे शेतकरी सतत दुःखी आहे.याच कुणाला काही देणं घेणं नसून यात फक्त व्यापारी,दलाल,राजकीय पुढारी सुखी असल्याचे परखड मत जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
येथील डिकसळ भागातील वेद शैक्षणिक संकुल या संस्थेच्या सभागृहात रविवार (ता.७) राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा व परमेश्वर पालकर लिखित प्रतीक्षा जगण्याची या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा जेष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी देशातील सर्व राज्यातील सरकारवर टीकेचे आसूड ओढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सबनीस होते.उद्घाटक जेष्ठ पत्रकार धनंजय लांबे,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,कौशल्य विकास विभागाचे मंत्रालय मुंबई सहायक आयुक्त संतोष राऊत,स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष के.पी. पाटील,तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे,पत्रकार भीमाशंकर वाघमारे, रवींद्र स्वामी उपस्थित होते.यावेळी सबनीस म्हणाले की,सद्या शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.राजकीय मंडळी राजकारणासाठी शेतकऱ्यांचा उपयोग करतात.आज देशातील शेतकरी आत्महत्या करतोय,राजकारणी,समाज व्यवस्था टिव्ही पुढे बसून जेवण करत आत्महत्या केल्याचे ऐकत आहे.पण शेतकऱ्यांची सुधारणा करण्यासाठी समाजही पुढे येत नाही ही शोकांतिका आहे.आयोजित कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर ‘ सकाळ ‘ चे तालुका बातमीदार दिलीप गंभिरे,आदर्श माता महानंदा जाधवर,सामाजिक कार्य सरोजनी राऊत,शिक्षणरत्न महादेव खराटे कळंब तालुका पत्रकार संघाचा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार अप्पासाहेब काळे, व,विज्ञान शिक्षक रमेश लोहकरे याना पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते परमेश्वर पालकर लिखित प्रतीक्षा जगण्याची या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर पालकर, सुत्रसंचलन महादेव गपाट यानी केले तर आभार अश्रुबा कोठावळे यानी मानले.यावेळी सर्व स्तरातील नागरिक, महीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले