कळंब – राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष ते राज्य उपाध्यक्ष या पदी उत्कृष्ट कार्य करणारे,उत्कृष्ट संघटक,आदर्श शिक्षक,उत्तम वक्ते,ओबीसी संघटनेची जिल्ह्यात बांधणी करून न्याय मिळवून देणारे,धडाडीचे नेतृत्व सुखदेव भालेकर यांच्या कार्याची दखल घेत,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष पै. दीपक जाधव, धाराशिव जिल्हाध्यक्ष जोतिराम बप्पा कोरे, कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी महादेव गाढवे,जी.प.सदस्य तानाजी माळी, अतूल लोहार, दीपक माळी, भास्कर कांबळे, अशोक चींचकर, टी जी माळी, शंकर कराड, विठ्ठल पोटे, दगडु मामा कोरे, उमेश मोराळे, सानप, सावता माळी, सुभाष मैंदाड, दत्तात्रय माळी, हनुमंत कोरे, दिलीपराव म्हेत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले