संभाजी नगर – देशातील ९०% चे वर संख्येने असलेल्या अंगमेहनती ( ज्यात शेतकरी – शेतमजूर, ऊसतोड कामगार, विट भट्टी कामगार, हमाल कष्टकरी, फेरीवाले, कंत्राटी कामगार तसेच दलित – आदिवासी, महीला, भटके विमुक्त.. इ…,,) कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य व केंद्र सरकार संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. लेह मधील रहीवासी राज्य निर्मितीच्या मागणीसाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. शेतकरी, शेतीमालाचे हमी भावास कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून देशभर आंदोलन करीत आहेत. राज्यातील माथाडी कामगार, कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी साठी राज्यभर मागणी करीत आहे या व अन्य मागण्यांसाठी, ७ एप्रिल हा राष्ट्रव्यापी मागणी दिवस म्हणून पाळण्यात येत असून, औरंगाबादेत रविवार दुपारी ११ वा. संविधान भवन, नारळी बाग येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड. सुभाष सावंगीकर, व अन्य समविचारी संघटनांची नेते मंडळी सहभागी होणार आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात समविचारी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साथी रामचन्द्र काळे, साथी छगन गवळी, साथी प्रविण सरकटे, साथी देविदास कीर्तिशाही, ऍड.अली खान, साथी नाजीम भाई , साथी आशाबाई डोके, साथी रेहाना बेगम, साथी ताराबाई खिल्लारे, साथी कांताबाई जाधव यांनी केले आहे केले आहे.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण