कळंब (महेश फाटक ) – तालुका मराठी पत्रकार मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज कार्यगौरव पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्ते आनंद बलाई यांना तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे यांना जाहीर करण्यात आला आहे.लवकरच एका कार्यक्रमात हे दोन्हीही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे,उपाध्यक्ष पार्श्वनाथ बाळापुरे,सचिव भिकाजी जाधव यांनी सांगितले आहे.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो