August 9, 2025

कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील तीन इसम जिल्ह्यातून हद्दपार

  • कळंब (जयनारायण दरक) – समाजामध्ये अशांतता पसरविणारे आणखीन दहा ते बारा गुन्हेगाराची यादी तयार आहे. नजीकच्या काळामध्ये त्यांनाही हद्दपार करण्यात येणार आहे असे कळंब पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.
    पोलीस स्टेशन कळंब अंतर्गत राहणारे अतुल आबासाहेब कोल्हे रा. हावरगाव ता.कळंब,शिवराज रामहरी लोकरे रा.खेर्डा ता.कळंब,उमेश महादेव लोकरे खेर्डा ता.कळंब
    यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कळंब येथे विविध कलमानुसार गुन्हे दाखल असल्याने आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता
    कळंब.पोलीस स्टेशन कळंब हद्दीतील इसम हद्दपारीची कारवाई व यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कळंब येथे विविध कलमानुसार गुन्हे दाखल असल्याने आगामी लोकसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे हद्दपारी करीता उपजिल्हाधिकारी कळंब यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यावर सुनावणी होवुन त्यांना प्रत्येकी ०३ महिन्यापर्यंत धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
    सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवि सानप,सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामहरी चाटे, पोहेकाॅ प्रशांत सोनटक्के, परमेश्वर जाधव,पोना शिवाजी राऊत यांनी केली आहे
error: Content is protected !!