August 9, 2025

निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

  • धाराशिव (जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे करण्यात येते.दि.१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागु झाली आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने तिस-या टप्प्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर केलेला असुन ७ मे २०२४ रोजी ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हयात मतदान होणार आहे.जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.जिल्हयातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!