August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात स्वच्छता हिच सेवा अभियान उत्साहात संपन्न

  • कळंब- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
    त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने पंतप्रधानांच्या निर्देशानुसार सकाळी ११ ते १२ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच महाविद्यालयाकडुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुढील पंधरवड्यात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे,उपप्राचार्य प्रा. पंडित पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाविद्यालय परिसरात महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी व विध्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.सदर अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाले.

error: Content is protected !!