August 9, 2025

रोटरीच्या वतीने खेळाडूंचा सत्कार व उत्कृष्ट देखावा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

  • कळंब – रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी पुरस्कार व सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांस प्रमुख अतिथी म्हणून रो. प्रभाकर साळेगावकर. ज्येष्ठ कवी माजलगाव हे उपस्थिती होते.तसेच रो. विनेश जाजू असिस्टंट गव्हर्नर ( 3132) रोटरी क्लब कळंब सिटी चे अध्यक्ष रो सुदर्शन नारकर सचिव रो.प्रा. डॉ .साजेद चाऊस यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.नेशन बिल्डर अवार्ड ने श्रीमती अंजली यादव जि.प. प्रशाला ईटकुर, श्री निशांत जिंदमवार विद्याभवन हायस्कूल कळंब, परमेश्वर मोरे सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब, संघशील रोडे अटल बिहारी वाजपेयी प्रशाला शिराढोण,डॉ.अशोक शिंपले,जि.प. प्र.कळंब, राजाभाऊ शिंदे जि.प.प्र. भाटशिरपुरा या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले व कळंबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या कोथळा येथील कु.शितल ओव्हाळ व शितल शिंदे रा.कोथळा यांनी आट्यापाट्या खेळांमध्ये केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केला. त्यांच्या या योगदाना साठी या गुणी खेळाडूंना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गणेश देखावा मध्ये व्यंकटेश मित्र मंडळ प्रथम क्रमांक, शहीद भगतसिंग मित्र मंडळ द्वितीय क्रमांक, शिवसेना तालीम संघ तृतीय क्रमांक या तीन गणेश मंडळ ना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इको फ्रेंडली आपला गणपती बप्पा आपण बनवूया या उपक्रमामध्ये श्री शरद अडसूळ यांनी कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
    ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर यांनी कविता गीत वाचनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व आदर्श शिक्षक व साहित्यिक हा नेहमी समाजाच्या हिताचे प्रबोधन करणारा असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. व सन्मानित झालेल्या शिक्षकांनी खेळाडूंनी गणेश मंडळांनी इथून पुढे यापेक्षाही चांगले काम आपल्या हातून व्हावे असे अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. सुशील तीर्थकर व रो संजय घुले यांनी केले . नेशन बिल्डर अवार्ड साठी प्रोजेक्ट चेअरमन रो संजय घुले व रो आनिगुंठे सर उत्कृष्ट गणेश देखावा साठी
    रो श्रीकांत कळंबकर होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव रो.प्रा. डॉ साजेद चाऊस यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ क्लब सिटी चे संजय देवरा,धर्मेंद्र शहा, विश्वजीत ठोंबरे,पापा काटे, डॉ.गिरीश कुलकर्णी, निखिल भडंगे,डॉ. किशोर मोरे, डॉ .सुयोग काकणी, डॉ .सुशील डेंगळे, डॉ .अमित पाटील, डॉ .थळकरी साहेब,डॉ. सचिन पवार, बाबत साहेब वैजनाथ पकवे, गणेश डोंगरे, किरण चव्हाण, विक्रम गायकवाड, सत्यन शेळके, इत्यादींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!