धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगेबाबा महाराजांनी सार्वजनिक स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन हि तत्वे समाजात रुजविण्यासाठी अत्यंत प्रयत्न केले. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आला. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख जितेंद्र कुलकर्णी,कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ.गोविंद कोकणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटिल उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कमवा व शिका योजना विभागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी विज्ञान भवन परिसरात स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी