August 9, 2025

अनाथ बालकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड,जातीचा दाखला,मतदान कार्ड काढून घ्यावे

  • धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,पहिला मजला,कक्ष क्र.10 धाराशिव येथे समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
    तरी जिल्ह्यातील अनाथ बालकांनी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये आधारकार्ड,रेशनकार्ड,जातीचा दाखला,अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदानकार्ड आदी काढण्यासाठी समर्पित कक्षातील अमोल कोवे (9595654823) व जयश्री भाले (9763239067) यांच्याशी संपर्क करावा.
    जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांनी आधारकार्ड,रेशनकार्ड, जातीचा दाखला,अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान कार्ड काढून घेण्यात यावे.तसेच याबाबत जनतेने,सामाजिक कार्यकर्ते, स्वंयसेवी संस्था यांनीही आपल्या परिसरातील,गावातील जास्तीत जास्त अनाथ बालकांना व त्यांच्या नातेवाईकांना या अनाथ पंधरवड्याची माहिती द्यावी.असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील अंकुश यांनी केले आहे.
error: Content is protected !!