August 9, 2025

चिमुकल्यांच्या गोड वाणीतून शिवविचारांचा विद्याभवन हायस्कूल येथे जागर

  • कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक पवार व्हि. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल येथे वक्तृत्व स्पर्धांचा आयोजन करून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा जागर चिमुकल्यांनी आपल्या वक्तृत्व कलेतून मांडला. यानिमित्त ४५ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संचालक पवार व्ही.एस. व पर्यवेक्षक खामकर डी टी. उपस्थित होते.कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेतील शिक्षक कानगुडे एस सी,पाटील एस एस, कोल्हे आर के,टोम्पे एस पी, वाघमोडे ए व्ही,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती माने एम एन,लोहार के एस, गुंजाळ एस ए,गायकवाड एस डी, लोमटे बी बी,गाडेकर बी पी,भोरे रेखा,काळे प्रिया यांनी परिश्रम घेतले तसेच यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशालेतील वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
error: Content is protected !!