लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे शिवबसव वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ते उद्घाटक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मन्मथ (अप्पा) लोखंडे हे होते तर विचारमंचावर संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसेचिंचोलीकर, कार्यकारी संचालक अँड. काशिनाथ साखरे, संचालक अँड. श्रीकांत अप्पा उटगे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य नरेश बिडवे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, संयोजन समिती सदस्य प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. कल्पना गिराम, प्रा. गोविंद पांढरे, प्रा. व्यंकट दुडीले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत विभागाचे प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. पुढे बोलताना बालाजी सुळ म्हणाले की, आपण आई-वडिलांचा सन्मान केला पाहिजे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चारित्र संपन्न बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पालकांची मान सातत्याने आपल्या कार्यामुळे उंचावेल असेच कार्य आपल्या हातून व्हावे. स्त्रियांचे मातृत्व ही श्रेष्ठता असते त्यामुळे स्त्रियांचाही सन्मान सर्वांनी केला पाहिजे. संपूर्ण समाजाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची दुःख आपण जाणून घेतले पाहिजे असे सांगून विविध हिन्दी आणि मराठी कलाकार आणि राजकीय नेते यांच्या आवाजाच्या हुबेहूब नकला करून उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे मने जिंकली. आपल्या अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव मन्मथ अप्पा लोखंडे म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलन हा आनंदाचा सोहळा असतो. हा आनंद व्यक्त करताना संयमाने आणि शिस्तीने विद्यार्थ्यांनी तो व्यक्त करावा. जीवनात यशस्वी होण्याकरिता प्रचंड मेहनत, वेळेचे नियोजन, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास याची नितांत गरज असते. परीक्षेला सामोरे जाताना धैर्य आणि आत्मविश्वासाने गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे यश लपलेले असते त्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन मार्गक्रमण करावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रास्ताविकपर मनोगत उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी केले तर प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर प्रमुख अतिथींचा परिचय पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना गिराम, टि. घन:श्याम यांच्यासह कु. अरब बुशरा, अवधूत कुलकर्णी, आरती वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. व्यंकट दुडीले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्होकेशनलच्या विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे