कळंब (अविनाश घोडके)- दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असून पाण्याचे संकट निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. यासाठी जल आत्मनिर्भरगाव करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावी असे आवाहन कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर यांनी केले आहे.आयसीआयसीआय बँक मुंबई ,परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग,मॅप्स इंडस्ट्रीज (इं) प्रायव्हेट लिमिटे पुणे, कर्नल शशिकांत दळवी ( निवृत्त) यांची पर्जन्य रेन वॉटर हार्वेस्टिंग कन्सल्टन्सी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाभळगाव ता.कळंब येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सुजाता तुषार वाघमारे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश झा,असिस्टंट जनरल मॅनेजर मुंबई,शंतनू कालेकर मॅनेजर,अनिरुद्ध तोडकर मॅनेजिंग डायरेक्टर, मॅप्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे, उपसरपंच विजयश्री नानासाहेब वाघमारे, परिवर्तन संस्थेचे मारुती बनसोडे इत्यादी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना चकोर म्हणाले की,पाणी म्हणजे जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नसेल यासाठी पाणी संवर्धन ही काळाची गरज असून पाणी संवर्धनाच्या अनेक पद्धती आहेत यातील रुफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत उपयुक्त पद्धत आहे. यासाठी आयसीआयसीआय बँकेने अर्थ सहाय्य केले असून या कामात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी शंतनू कालेकर, राजू तेली, अनिरुद्ध तोडकर यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार वाघमारे यांनी केले.यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या डेमो प्लांट चे उद्घाटन शैलेश झा व आर .व्ही.चकोर यांच्या हस्ते करण्यात आले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले