August 8, 2025

लोकहीत सामाजिक विकास संस्थेचा सन्मान

  • कळंब – लोकहीत सामाजिक विकास संस्थेने भटक्या विमुक्त व पारधी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील वस्ती तांड्यावर पाड्यावर मतदार नोंदणी केली.या राष्ट्रीय कार्यक्रमात लोकहीत संस्था सहभागी होऊन लोकशाहीला बलशाली बनवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल लोकहीत संस्थेच्या अध्यक्षा सौ.मायाताई शिंदे व सचिव बजरंग ताटे यांचा उपविभागीय अधिकारी संजय पाटील तहसीलदार मनीषा मेने यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    लोकहीत सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून बजरंग ताटे हे गेली २५-३० वर्षी पासून उस्मानाबाद जिल्ह्यात पारधी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील प्रश्नांवर व महिलाचे हक्क अधिकार ,बालकांचे शिक्षण, आरोग्य रोजगार, गायरान जमिन प्रश्नावर,दलित बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व त्याचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. यापुर्वीही दिल्ली येथे मानवाधिकार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आता धाराशिव कळंब येथे भारत निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय धाराशिव यांनी लोकहीत सामाजिक विकास संस्थेच्या कामाची दखल घेऊन संस्थेला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.यावेळी कळंब तालुक्याच्या तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार गोपाल तापडिया, नायब तहसीलदार मुस्ताफा खोंदे,खलील शेख आदि उपस्थित होते.
error: Content is protected !!