August 8, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर येथील चिमुकल्यांकडून विविध कलाविष्कार सादर

  • डिकसळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले .बालचिमुकल्यांनी हिंदी,मराठी,लावणी,भारुड सांस्कृतिक गीते विविध वेशभूषांमध्ये सादर केली. मुलांनी कोळी,शेतकरी हॉलीवुड,मराठी गीते विविध कलाकार सादर केले. स्नेहसंमेलनातील नृत्यामध्ये गोंधळी नृत्य प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तर १५० विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. याप्रसंगी डिकसळचे सरपंच नानासाहेब धाकतोडे तसेच उपसरपंच हरिभाऊ कुंभार ,धनंजय घोगरे ,परमेश्वर पालकर , राजेंद्र बिक्कड,युवराज धाकतोडे ,जनक आंबिरकर,संजय अडसूळ ( लोहटा पश्चिम सरपंच),रविकांत बापू सोनवणे संस्थेचे मार्गदर्शक यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राहुल भैया सोनवणे वीर हनुमान शिक्षण संस्थेचे सचिव यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व प्रस्ताविक केले ,कोरोना सारखा महामारी येऊ नये तसेच त्यामुळे शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन घेता आले नाही परंतु आता या पुढे दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाईल असे म्हटले . डी डी बनसोडे व प्रविण तांबडे यांनी छान सुत्रसंचलन केले . मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना खूप परिश्रम घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला.

error: Content is protected !!