August 9, 2025

अल्पसंख्यांक विभागाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी शफी हाशमी यांची निवड

  • उदगीर – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शफी हाशमी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या लातूर ( ग्रामीण ) जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राकॉपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, अहमदपुर विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटी, छ. संभाजी नगर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रमजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व्यंकटजी बेद्रे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसरजी शेख व जिल्हा कार्याध्यक्ष पंडीतराव जी धुमाळ यांच्या शिफारसी नुसार नियुक्ती करण्यात आली .
    या वेळी वैद्यकीय शिक्षण हसनजी मुश्रिफ , आ.बाबाजानी दुराणी, राकाँपाचे प्रदेश कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे निरिक्षक नजीबजी मुल्ला,प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी व प्रदेश कार्याध्यक्ष वसिमजी बुर्हाण यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यांच्या या निवडीबद्दल शहराध्यक्ष समीर शेख, विधान सभा अध्यक्ष प्रवीण भोळे, महिला कार्याध्यक्ष अँड दिपाली ताई औटे ,रा.काँ.पा. सांस्कृतिक विभाग लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, रा. काँ.पा.सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, विनोद सुरेशराव पदमगिरवार – शहर कार्याध्यक्ष सांस्कृतिक विभाग उदगीर, सलीम वहिद सय्यद – शहर अध्यक्ष सांस्कृतिक विभाग उदगीर ,विशाल दयानंद मसुरे – तालुका उपाध्यक्ष रा. काँ . पा . सामाजिक न्याय विभाग उदगीर, अजिम ईस्माईल हाशमी – तालुका उपाध्यक्ष रा. काँ . पा . अल्पसंख्यांक विभाग उदगीर, गौस अहमदखा गोलंदाज – शहर उपाध्यक्ष रा. काँ . पा . अल्पसंख्यांक विभाग उदगीर , शेख मोहमद ईस्माईल शहर उपाध्यक्ष रा. काँ . पा . अल्पसंख्यांक विभाग उदगीर यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!