August 9, 2025

मुलींनी स्वावलंबी होऊन नंतर लग्नाचा विचार करावा – प्रा.मंगल ढेंगळे

  • कळंब (अरविंद शिंदे )- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ही थीम घेऊन सात दिवशीय शिबिर संपन्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.१८ जानेवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या वतीने मौजे डिकसळ येथे सकाळी ११ वाजता,बालविवाह प्रतिबंध काळाची गरज या विषयावर प्रा. मंगल ढेगळे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर प्रुमुख उपस्थितीमध्ये डॉ.पल्लवी उंदरे,व अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर तर अध्यक्षस्थानी प्रा.सरस्वती वायभसे होत्या.पुढे प्रा.ढेंगळे म्हणाल्या की,मुलींनी स्वावलंबी होऊन नंतर लग्नाचा विचार करावा,आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे असे आव्हान त्यांनी केले.तसेच दुसऱ्या सत्रामध्ये किशोरवयीन मुलींच्या समस्या या विषयावर प्रा.मीना साखळकर यांनी मुलींचे शिक्षण,आरोग्य व किशोरवयीन वयातील मुलींच्या समस्या व विशेषता मुलींचे वय ज्या वेळेस १२ ते १८ असते. त्या वेळेस आलेल्या मासीक पाळीच्या समस्या या विषयावर मुलींच्या पालकांनी सवांद साधावा व त्यांचे मित्र बनून त्यांच्या समस्या जाणून घ्यावेत असे मार्गदर्शन त्यांनी केले.व अध्यक्षीय समारोपात प्रा. वायभसे यांनी मुलींनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होऊन आपला व्यक्तीत्वत विकास साधावा.विशेषता चांगला व सकस आहार घेऊन आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वर्षा सरवदे यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. मीनाक्षी जाधव,तर आभार प्रा.अर्चना मुखेडकर केले. या कार्यक्रमाला लेफ्टनंट डॉ.हरिभाऊ पावडे, डॉ. श्रीकांत भोसले व कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप महाजन, डॉ.नामानंद साठे,व हनुमंत जाधव अधीक्षक तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष, अर्जुन वाघमारे,कमलाकर बंडगर, व रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!