August 9, 2025

अबब डी.पी.नसताना,विद्युत जोडणी नसताना तरी देखील एक लाखाचे बिल त्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा?

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
    तीन वर्षां खाली अर्ज दिला,डी.पी. बसवला नाही,विद्युत जोडणी केली नसताना हि विद्युत मंडळाने मात्र एक लाख चार हजार पाचशे पन्नास रुपयांचे बिल दिले असून हे चुकीचे बिल रद्द न केल्यास सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा कळंब तालुक्यातील कोथळा येथील शेतकरी राजाराम डोंगरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,रामदास डोंगरे यांची जमीन कोथळा येथे असून गट नंबर 57 मध्ये बोअरवेल करिता 7.5 एच.पी.अश्वशक्ती क्रशी पंपासाठी विज जोडणी मिळावी या साठी वीज वितरण कंपनी कडे 4 डिसेंबर 2021 रोजी डिमांड रक्कम 11185 रू एच. व्हि,डी.एस.योजने अंतर्गत भरलेले आहेत ज्यांचा ग्राहक क्रमांक 607190002847 असा आहे. सदरील डिमांड प्रमाणे वीज जोडणी केलेली नाही या संबंधात वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत या योजने अंतर्गत डोंगरे यांनी विद्युत लाईट चा वापर केलेला नसताना, डिसेंबर 2021 मध्ये 26880/-,रू, 2022 मध्ये 54370 तर 2023 मध्ये 104550 रुपयाचे बिल दिलेले आहे.
    शेतकरी राजाराम डोंगरे यांच्या शेतात मागणी केल्या प्रमाणे डी.पी.तसेच विद्युत जोडणी केलेली नाही चुकीच्या पद्धतीने बिल देण्यात येत असून, वेळोवेळी या संदर्भात अर्ज दिलेले असून याची दखल घेतलेली नाही. शेता मध्ये येवून आधिकार्यानी पाहणी करावी,खोटे बिल देणाऱ्या संबंधित अधिकार्या विरोधात कारवाई करावी,चुकीचे बिल रद्द करण्यात यावेत,नसता 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी रामदास पंढरीनाथ डोंगरे यांनी दिला आहे.
error: Content is protected !!