बदलापूर ( तात्यासाहेब सोनवणे यांजकडून) – कुळवाडी भुषण बहुजनपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आऊसाहेब स्वराज्यजननी “राष्ट्रमाता जिजाऊ “,यांच्या जयंती निमित्त सहारा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षा सौ. शर्मिलाताई सोनवणे यांनी राजमाता जिजाऊच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रूग्णहक्क संघर्ष समिती, जीवनआधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख तात्यासाहेब सोनवणे यांनी, आदर्श मातांना अभिवादन करताना जेष्ट साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांची तुला आळविता स्फुरतात बाहू, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ.. आईस माझ्या बहिणीस माझ्या कळू दे, तू लावला दीप त्यांच्यातही जळू दे. भांडू नका भावास भाऊ.! कविता सादर केली. यावेळी सौ. माळी बाई, सौ.प्रज्ञाताई येलवे,सौ.वृषाली पवार, श्री. गणेशशेठ शेलार, श्री. योगेश येलवे, सुयोग सोनवणे यांनी अभिवादन करताना सामाजिक बांधिलकी जपताना सहारा महिला मंडळाच्या राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे कौतुक केले. अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाबाई,अनाथाची माता सिंधुताई सकपाळ आशा आदर्श मातांचा नव्या पिढीला विस्मरण होवू नये अशी भावना व्यक्त केली.
More Stories
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt Memory तपासणी प्रक्रिया पूर्ण
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात