August 9, 2025

शिक्षक आधुनीक भारताची युवापिढी घडवण्याचे पवित्र काम करतात – सरपंच बळवंत तांबारे

  • कळंब – शिक्षक हे आधुनीक भारताची युवापीढी घडवण्याचे पवीत्र काम करत असतात. त्या मुळे शाळेतील भौतीक सुवीधेसाठी शिक्षकांनी केव्हाही हाक द्यावी.आम्ही त्या सुविधा देण्याचे काम करू असे प्रतिपादन शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आंदोरा गावचे सरपंच डीसीसीचे संचालक बळवंत तांबारे यांनी जिल्हा परिषद शाळेमधील वाढदिवसानीमीत्त करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी भावनीक आवाहन केले.
    कळंब तालुक्यातील आंदोरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच डीसीसीचे संचालक बळवंत तांबारे यांच्या वाढदिवसानिमीत्त जील्हा परिषद प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.या वेळी सरपंच बळवंत तांबारे, उपसरपंच दत्तात्रय तांबारे,ग्रा.पं सदस्य नीतीन तामाने,मुख्याध्यापक राम शिंदे,साहाय्यक शिक्षक कदम, टोणगे,ढोले, पठाण,साहाय्यक शिक्षक वैद्य,तोडकर, देशमुख, तवले, साळी, तंटा मुक्ती अध्यक्ष कालीदास तांबारे शिक्षण समीती अध्यक्ष आदिनाथ कवडे, अनंत तांबारे,झुंबर बाराते,हानुमंत तामाने, दादा कदम, दादा कोळी, अंकुश डिगे,किरण कवडे, हेमंत तांबारे आदि उपस्थीत होते.
    या वेळी शालेय विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सरपंच बळवंत तांबारे यांचा मुख्याध्यापक राम शिंदे व स्टापच्या वतीने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला .
    या वेळी सत्काराला उत्तर देताना बळवंत तांबारे यांनी शाळेसाठी आमदार कैलास पाटील यांनी डीपीडीसी मधुन शाळेसाठी नवीन शाळा खोली बांधकाम मंजुर केल्याचे सांगत विद्यार्थ्याना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणी फील्टर तसेच शाळेच्या प्रांगणात पावसाळ्यात चीखल होत असल्याने पेवर ब्लॉक बसवण्याचे नियोजन करण्यात आले असुन हि कामे तात्काळ करण्यात येतील शाळेसाठी भौतीक सुविधा देण्याचे काम आम्हा गावकऱ्यांचे आहे परंतु गुणवत्ता वाढदिण्याचे काम शिक्षकांनी करावे शिक्षण हे नोकरीसाठी नसुन तर ते आदर्श सुसंस्कारीत विद्यार्थी घडवण्यासाठी असावे या साठी शिक्षक काम करतात त्यातुनच विद्यार्थी घडतात भौतीक सुविधेसाठी तुम्ही आम्हाला हाक द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शाळेला लागेल ती सोयी सुविधा देण्याचे काम आम्ही करू अशी भावनीक साद त्यांनी शिक्षकांना घातली.या कार्यकमाचे सुत्रसंचलन व आभार वैद्य मॅडम यांनी मानले.
error: Content is protected !!