August 9, 2025

शिराढोण येथील व्यापारी संकुल उभारण्यास मान्यता

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे ) – कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे उपबाजार शिराढोण येथील २० गाळाच्या लिलावा करिता स्वारस्या अभिव्यक्तीची जाहिरात देण्याकरिताची पणन संचालक कार्यालयाने मान्यता
    दिली अशी माहिती बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी दिली.
    कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे उपबाजार पेठ शिराढोण येथे स्वारश्या अभिव्योक्तीतून २४ गाळ्याचे बांधकाम करावयाचे संचालक मंडळाने ठरवले होते,त्याबाबतचा ठराव संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत पारित झाला होता. त्याबाबतचा प्रस्ताव पणन संचालक म.रा.यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता.सदर प्रस्तावास मान्यता मिळावी म्हणून आमदार कैलास पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्या मुळे आज बाजार समितीचे पत्र प्राप्त झालें व आमदार कैलास पाटील यांना मान्यतेचे पत्र देताना पणन संचालक शैलेश कोतमिरे,सभापती शिवाजी कापसे,दिलीप पाटील.
    यां गाळ्याच्या लिलावा बाबत लवकरच जाहिरात प्रसिद्धी होईल.
    लिलावास प्रतिसाद मिळाल्या नंतर वेगळे खाते काढण्यासाठी व बांधकाम साठी कलम १२/१ ची मंजुरी प्राप्त होऊन कामकाज सुरु होईल सदर गाळे बांधकाम करून मिळणार आहेत.यातून बाजार समितीचे उपबाजार पेठ शिराढोण सुरु होण्याच्या मार्गांवर आहे यां पूर्वी २० भूखंड व आत्ता २० गाळे यातून बाजार समितीचे चे कामकाज किती वेगाने होत आहे याबाबत लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लवकरच बाजार समिती उप बाजारपेठ सुरू होणार असा विश्वास लोकांना वाटत आहे.
error: Content is protected !!