कळंब – दि.१२ जानेवारी २०२४ रोजी श्री संत बोधले महाराज शाळेत स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक पोपट निकम व शालेय पोषण आहार मदतनीस श्रीमती शर्मिला पवार यांनी केले. जिजाऊंच्या वेशभूषेत आलेल्या मुलींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेतील आराध्या त्रिवेदी, आश्लेषा लोंढे, सुप्रिया गालफाडे , अंकिता आंबीरकर संध्या गायकवाड , सई आंबिरकर, जानवी राजमाने ,नेहा जाधव, सिद्धी जाधव, शुभ्रा बोराडे वैष्णवी काटे, स्वाती गायकवाड, ओमकार कुचेकर, रूद्र गायकवाड ,खुशी वाघमारे ,श्रावणी मगर या सह अनेक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल भाषणातून आपले विचार व्यक्त केले.तर काही मुलींनी जिजाऊ वंदना सादर करून कार्यक्रमात उत्साह वाढविला. तसेच शाळेतील शिक्षक सुरज राऊत ,पोपट निकम,रमेश आंबिरकर ,प्रदीप यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ३० च्या पुढे पाढे पाठ झाले आहेत अशा गुणी विद्यार्थ्यांना वही पेन देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक निकम .पी.आर सहशिक्षक रमेश आंबिरकर ,प्रदीप यादव,सुरज राऊत ,नामदेव झाडे , सज्जन बर्डे व माता पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज राऊत यांनी तर आभार प्रदर्शन रमेश आंबिरकर यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले