August 9, 2025

जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सोपान पवार सन्मानित

  • कळंब ( विशाल पवार यांजकडून ) – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई संलग्न अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती सोलापूर,सानेगुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूल या प्रशालेतील मराठी विषयाचे नवोउपक्रमशील सहशिक्षक सोपान पवार यांना जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यांनी प्रशालेत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांना महत्त्व सांगून प्रशालेतील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या संख्येने परीक्षेस बसवले होते तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध नवोपक्रम उपक्रम राबविले आहेत .मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर व सहभाग ,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे बालभारती सदस्य कार्यशाळेसाठी निवड, विविध शैक्षणिक निबंध लेखन ,शैक्षणिक लेख ,सामान्य ज्ञान स्पर्धा कथाकथन स्पर्धा ,निबंध लेखन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या आहेत .या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले.या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचेअध्यक्ष प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार , प्रमुख अतिथी प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील पुजारी, साने गुरुजी कथामाला समिती अध्यक्ष अशोक खानापुरे, उपाध्यक्ष आरती काळे ,कार्यवाहक रामचंद्र धर्मसाले कार्याध्यक्ष अवधूत म्हमाने, या मान्यवरांच्या हस्ते सोपान पवार याना जिल्हास्तरीय उपक्रमाशील शिक्षक पुरस्कार सन्मानपत्र ,श्यामची आई पुस्तक, घड्याळ ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साने गुरुजी कथामाला धाराशिव , जिल्हाध्यक्ष डी.के.कुलकर्णी,ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, विद्याभवन हायस्कुल मुख्याध्यापक विलास पवार,मुख्याध्यापक संघ धाराशिव अध्यक्ष सुरेश टेकाळे,प्राचार्य महादेव गपाट,प्रदीप यादव आदींनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!