उमरगा – येथील समाज विकास संस्था आणि दान उत्सव समिती उमरगा याचे सभासद अँड. प्रवीणजी तोतला,राजू सगर, गुगळे कोचिंग क्लासेसचे मुगळे, महिला राज्य सत्ता आंदोलनाच्या प्रणेत्या विद्याताई वाघ,भूमिपुत्र वाघ यांच्या सहभागातून रस्त्यावर झोपलेल्या स्टैंड वर झोपलेल्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या लोकांना पांघरायची सोय नसते.थंडीत कुरकुडणाऱ्या शेवटच्या माणसांचा शोध घेऊन दरवर्षी हिवाळ्यामध्ये संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. कपड्याच्या दानाचा महोत्सव व्हावा, विचाराचा, महोत्सव व्हावा, अन्नदानाचा महोत्सव व्हावा म्हणून समाज विकास संस्था शेवटच्या माणसांचा शोध घेत कार्य करीत असते. काल रात्री अशाच शेवटच्या माणसांचा शोध घेऊन त्यांना रगीचे दान केलं. याप्रसंगी धीरज बेळबकर, लक्ष्मण पवार, कृष्णा पाटील, विकास गायकवाड या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने रगीचे दान करण्यात आलं. हा मदतीचा महोत्सव गावागावातून व्हावा. उघड्यावरती कुणी नसावा. उपास पोटी कुणी नसावा. ही सदभावना घेऊन सामाजिक काम व्हावे असे मत महाराष्ट्र लोकविकास मंचाचे सचिव भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली.
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय