कळंब – स्वराज इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ललित बाबर व महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर हे दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी कळंब शहरात आले असता त्यांचा ढोकी रोडवरील श्रीराम ऑफसेट येथे स्वराज इंडिया शहर शाखेच्या वतीने पुष्पहार,गुच्छे व बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योत हे वृत्तपत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव आडसूळ महाराज,स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,शहराध्यक्ष उपसंपादक माधवसिंग राजपूत,निवासी संपादक रामेश्वर खापे,शिराढोण प्रतिनिधी परमेश्वर खडबडे,विकास कुदळे,दिलीप जाधव,पवनराजे खापे व कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले