धाराशिव – श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त येरमाळा परिसरात होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून २ एप्रिल ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सर्व अवजड वाहनांना (Heavy Vehicles) संबंधित मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या अहवालानुसार यात्रेदरम्यान पालखी मिरवणूक, चुनखडी वेचणे व पौर्णिमा सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक विविध वाहनांनी येरमाळा येथे येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१)(ब) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. येरमाळा मार्गावरील छत्रपती संभाजीनगर,बार्शी,कळंब,परळी व परभणीकडून येणाऱ्या व जाणाऱ्या अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात आले असून या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान,हा आदेश पोलीस, रुग्णवाहिका,अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा,हलकी वाहने व एस.टी.बसेस यांना लागू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिक व वाहनचालकांना वाहतूक बदलाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
More Stories
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज;४०० पोलीस,५०० होमगार्डसह व्यापक नियोजन
येरमाळ्यात येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवासाठी ६ मार्चला नियोजन बैठक
एनएमएमएस परीक्षेत ज्ञानोद्योग विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी; १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सत्कार