धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 मार्च रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 291 कारवाया करुन 2,47,850 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
आंबी पोलीस ठाणे:आरोपी नामे-बबन उंबर चव्हाण, वय 51 रा. आलेश्वर ता. परंडा जि. धाराशिव हे दि.27.03.2026 रोजी 17.00 वा.सु.आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-शितल दिपक पवार,वय 28 वर्षे,रा.जुना बस डेपो ह.मु. रमाईनगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.27.03.2026 रोजी 19.30वा.सु.रमाई नगर धाराशिव येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये आंनदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-बबन रामदास चव्हाण,वय 36 वर्षे,रा.शेळगाव ता.परंडा जि. धाराशिव हे दि.27.03.2026 रोजी 17.50 वा.सु.शेळगाव येथे रा.राजेशनगर ढोकी येथे अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.27.03.2026 रोजी 12.30 ते 14.30 वा. सु. नळदुर्ग पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-रमजान मेहताब शेख, वय 29 वर्षे, रा. नळदुर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. जळकोट येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे-मोईन गफार कुरेशी, वय 43 वर्षे, रा. रहिम नगर नळदुर्ग जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. अक्कलकोट रोडलगत चिकन दुकानाच्या बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.27.03.2026 रोजी 18.35 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत हॉटेल प्रेस्टीज समोर धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जमीर हबीब तांबोळी, वय 39 वर्षे, रा. आगडगल्ली ता. जि. धाराशिव हे 18.35 वा. सु. हॉटेल प्रेस्टीज समोर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,230 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.27.03.2026 रोजी 17.30 वा. सु. लोहारा पो ठाणे हद्दीत बीएसएनएल ऑफीस जवळ हॉटेलचे बाजूला छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बालेपीर हज्जु शेख, वय 54 वर्षे, रा. चिंचोली ता. लोहारा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. बीएसएनएल ऑफीस जवळ हॉटेलचे बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 950 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-निजाम अफजल खय्युम कुरेशी, वय 30 वर्षे, रा.कुरेशी गल्ली नळदुर्ग जि. धाराशिव यांनी दि27 3.02.2025 रोजी 11.00 वा. सु. ॲटो रिक्षा क्र एमएच 12 बीडी 3488 हा नळदुर्ग बसस्टॅण्ड येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे आरोपी नामे-जयवंत रमेश बरखडे, वय 21 रा. कुसुमनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 27.03.2026 रोजी 13.40 वा. सु. पारडी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पुलावर हिवरा येथे पिकअप क्र एमएच 23 एयु0752 मध्ये गोवंशीय जातीचे 4 गोवंशीय जातीचे जनावरे एकुण 1,00,000₹ किंमतीचे वाहनासह एकुण 4,00,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे जनावरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ड) सह 5(अ),5(ब), 9(ए) पशु संरक्षण अधिनियम अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-निळकंठ तानाजी फत्तेपुरे, वय 36 वर्षे, रा. बोरी ता.उमरगा जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.26.03.2026 रोजी 23.30 ते दि.27.03.2026 रोजी 02.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व आत्माराम दशरथ होळकर यांचे घराचे कडी कोंडा तोडून रोख रक्कम 50,000 ₹ असा एकुण 1,30,250₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निळकंठ फत्तेपुरे यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- प्रमोद मारुती इंगळे, वय 35 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 3790 ही दि.18.03.2026 रोजी 19.45 ते 20.15 वा. सु.ढोकी येथील इस्लामी खानावळ समोर मोकळ्या जागेतुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रमोद इंगळे यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-हिरालाल जनार्धन पेडगावकर, वय 66 वर्षे, रा. स्वाती समर्थ नगर बार्शी रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचे समर्थ ज्वेलर्स खर्डेकर गोल्ड या दुकानामध्ये परंडा येथे अनोळखी चार महिलांनी दि. 26.03.2026 रोजी 12.40 वा. सु. दुकानातील 600 ग्रॅम वजनाचे 7 पायातील चांदीचे पेंजणाचे जोड एकुण 80,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हिरालाल पेडगावकर यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-सोन्या मंडले, रा. बेरडवाडी, अभि मंडले, रा. कोथळी, डीडी चवृहाण, राजु मडीवाळ रा. आलुर ता. उमरगा जि.धाराशिव व इतर एक इसम यांनी दि.26.03.2026 रोजी 18.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक आलुर येथे फिर्यादी नामे-लक्ष्मीकांत यादव गुरवे, वय 36 वर्षे, रा.आलुर ता. ता.उमरगा जि. धाराशिव यांचे लोकेश चायनिज हॉटेल नमुद आरोपींनीचे घर हॉटेलच्या पाठीमागे असुन सदर हॉटेल चालवण्यास नमुद आरोपींनचा विरोध असुन मागील भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, पट्टी, तलवार, हंटर, बंदुकने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लक्ष्मीकांत गुरवे यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे मुरुम येथे भा.न्या.सं.कलम 109, 49, 3(5) सह 3,25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-तानाजी शहाजी काळे, धनु उत्तम काळे, चंदु धनु काळे, मैनाबाई महादेव काळे, आबा अंबऋषी काळे, सर्व रा. पार्डी ता. वाशी, लक्ष्मण बापु पवार, रा. वाशी, सुनिल भागवत काळे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.21.03.2026 रोजी 20.00 ते 20.15 वा. सु. पार्डी येथे फिर्यादी नामे-शंकर बापु काळे, वय 35 वर्षे, रा. पार्डी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयता, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शंकर काळे यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1), 115(2), 352,351(2),351(3), 189(2), 190, 191(1), 191(2), 191(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“खंडणी.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-दगडु जुळजीराम लगाडे, रणजित दगडु लगाडे, धम्मदिप राणजित लगाडे, प्रशांत रत्नप्रकाश शिंदे, आकाश अच्युत लगाडे, किरण वसंत शिंदे, अविनाश राजेंद्र लगाडे, सर्व रा. खानापूर ता. वाशी, निलेश लगाडे रा. इंदापुर ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 26.03.2026 रोजी 15.00 वा. सु. खानापुर शिवारात खानापूर पाटी ते खानापूर जाणारे डांबरी रस्त्यावर गदडू तुळजीराम लगाडे यांचे घरासमोर टी पी वर्ध्ज्ञमाने सुर्या लि.के.टी. 07 पवनचक्की या कंपनीचे नांदगाव शिवारात पवनचक्की सबस्टेशनचे समान घेवून जाणारे वाहने आडवुन करारनामा प्रमाणे रक्कम दिलेली असताना ट्रॅक्टर व मोटरसायकल रोडवर आडवी लावून वाहने सोडवण्यासाठी खंडणी 2,00,000₹ ची मागणी करुन पैसे न दिल्यास वाहने जाळुन टाकीन अशी धमकी देवून शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय शिवाजी माने, वय 41 वर्षे, रा. शिरगाव ता. वाई जि. सातारा, ह.मु. मैत्रीपार्क वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 308(4), 126(2), 352, 351(2)(3), 189, 160, 191(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : मयत नामे-सलीम फरीद मुल्ला, रा.चुंगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर हे दि.24.03.2026 रोजी 17.00 वा. सु. नळदुर्गते अक्कलकोट रस्त्यावर बीके फंक्शन हॉलच्या पुढे नळदुर्ग शिवारातुन मोटरसायकलवरुन जात होते. दरम्यान कॉन्टकृटर कंपनी शांभवी कन्स्ट्रक्शन 142-ए/बी-4 शेटे नगर लक्ष्मी पेठ सोलापूर यांची नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्याचे काम खराब व निकृष्ट दर्जाचे करुन तो वाहतुकीस व्यवस्थीत नसताना त्यावर दिशादर्शक फलक न लावता व डायव्हरशन न करुन हायगयी व निष्काळजीपणा केल्यामुळे यातील मयत सलीम मुल्ला यांचा अपघाता होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आझाद सलीम मुल्ला, वय 38 वर्षे, रा. चुंगह ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांनी दि.27.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा : ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान
नवतेजस्विनी महोत्सवात महिला उद्योजकतेची झेप;दोन दिवसांत ७ लाखांहून अधिक विक्री