परंडा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे मार्ग उघडणारा आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा रोजगार मेळावा हा नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा उपक्रम आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सतीश कदम यांनी केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय,परंडा येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,महाराष्ट्र शासन आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २०२६ उत्साहात पार पडला.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात ११ नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध कंपन्यांकडून सुमारे २१० पदांसाठी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात आली. मेळाव्यात १४० महिला आणि १६९ पुरुष अशा एकूण २९९ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मेळाव्यात सुदर्शन सौर शक्ती (वाळूज,छत्रपती संभाजीनगर), दर्शना सोलवंट (बार्शी),तेजस सुपर स्ट्रक्चर प्रा.लि.(धाराशिव), स्टार एंटरप्राइजेस (परंडा), एस. एम. पब्लिक स्कूल (परंडा), आदर्श इंजिनिअरिंग वर्क्स (भूम), एलआयसी (धाराशिव), एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी (धाराशिव),प्रथम एज्युकेशन फाउंडेशन (छत्रपती संभाजीनगर),सुरेटा उद्योग (परंडा) आणि रेड अलर्ट फायर सिस्टीम (बार्शी) या आस्थापनांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय (बप्पा) निंबाळकर होते.उद्घाटक म्हणून ज्येष्ठ इतिहासकार डॉ.सतीश कदम उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे,जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव,उद्योग निरीक्षक अभिजीत लांडे,सीए बालकिशन जाजू,उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने तसेच कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख उपस्थित होते. या वेळी दत्ता चव्हाण यांनी प्रास्ताविकात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली. अभिजीत लांडे,जी.एम.दिवटे आणि डॉ.सतीश कदम यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात संजय बप्पा निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचे आवाहन केले.छोट्या उद्योगातूनही मोठे उद्योगपती घडू शकतात,असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अरुण खर्डे यांनी मानले.मोठ्या संख्येने प्राध्यापक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी या रोजगार मेळाव्यास उपस्थित होते.
More Stories
रा.गे. शिंदे महाविद्यालयात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’; १२ आस्थापनांकडून ३१० पदांसाठी मुलाखती
रा.गे.शिंदे महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात
जनसेवेची परंपरा कायम; नगरसेवक रत्नकांत ‘पापा’ शिंदे यांचा प्राध्यापकांकडून सत्कार