धाराशिव (जिमाका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ” विकसित भारत संकल्प यात्रा ” ही मोहीम देशभरात राबविली जात आहे. ज्या लोकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजना पोहोचल्या नाही तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या गरजू लाभार्थ्याचा शोध घेवून त्या लाभार्थ्याना योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायतींपैकी 331 ग्रामपंचायतीत यात्रेच्या माध्यमातून सर्व शासकीय योजनांचा जागर करण्यात येत आहे.आतापर्यंत 331 ग्रामपंचायतीत 84 हजार 216 ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये 508 लाभार्थ्यांची “मेरी कहानी मेरी जबानी” अंतर्गत मुलाखती घेण्यात आल्या आहे. तसेच 33 हजार 717 लोकांनी देशाच्या विकासाचा संकल्प घेतला. यात्रेदरम्यान 10 हजार 307 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 6 हजार 411 टीबीचे रुग्णांना उपचार देण्यात आले.5385 जणांची सिकल सेल तपासणी करण्यात आली, तसेच माय भारत वॉलेंटियर रजिस्ट्रेशनमध्ये 129 जणांनी नोंदणी केली. 229 जणांनी सुरक्षा बीमा योजना आणि 178 लोकांनी जीवन ज्योती बीमा योजना घेतली. या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट भारत सरकारच्या 20 योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच गेल्या 9 वर्षातील उपलब्धी आणि ऑन स्पॉट सेवांवर लक्ष केंद्रित करणे हा आहे. जनसामान्यांचे भागीदारीच्या माध्यमातून वैयक्तिक अनुभवाच्या देवाणघेवाणीद्वारे केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. वेगवेगळ्या योजनांबद्दल माहितीचा प्रसार आणि नवीन योजनांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 12 मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सर्व योजनासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंद करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक कार्यक्रमात “मेरी कहानी मेरी जुबानी” अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची मुलाखत घेण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत.यातूनच शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद आणखी दृढ होईल.नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती नसल्याने ते अनेक लाभांपासून वंचित राहतात.अशा वंचित लाभार्थ्यांना ओळखून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा या हेतूने ही रथ यात्रा जिल्ह्यात शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना व नागरिकांना देत आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने “ विकसित भारत संकल्प यात्रा ” नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे.ही यात्रा 15 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे.भारत सरकारच्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. आजही काही लाभार्थी केंद्राच्या विविध योजनांपासून वंचित आहे.या लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व्हावी आणि त्यामाध्यमातून त्यांनी या योजनांचा लाभ मिळावा यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभार्थी व नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी या मोहिमेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन