March 12, 2026

जय भवानी विद्यालय,पारा परीक्षा केंद्राला भरारी पथकाची भेट;

  • परीक्षा व्यवस्थेवर समाधान व्यक्त
    पारा – दिनांक ११ मार्च २०२६ रोजी केंद्र क्रमांक ६१६२ असलेल्या जय भवानी विद्यालय, पारा (ता. वाशी) येथे भरारी पथकाने भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा केंद्रावर शिस्तबद्ध आणि सुरळीत परीक्षा प्रक्रिया पार पडत असल्याचे चित्र दिसून आले.
    यावेळी उपशिक्षणाधिकारी माळी यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने केंद्रातील विविध परीक्षा हॉलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था,देखरेख आणि परीक्षा संचालनाची तपासणी केली. तसेच परीक्षा प्रक्रियेतील शिस्त व नियोजनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
    याप्रसंगी तपासणी पथकातील सदस्यांसह बैठे पथकातील विस्तार अधिकारी कोल्हे,संतोष भोजने व केंद्र संचालक नवनाथ सुर्यवंशी इतर सदस्य उपस्थित होते.पथकाने केंद्रातील व्यवस्थापन,शिक्षकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची शिस्त याबाबत समाधान व्यक्त करत परीक्षा सुरळीतपणे पार पडत असल्याचे नमूद केले.
error: Content is protected !!