कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात पार पडला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका प्रत्यक्ष अनुभवत अध्यापनाचा अनोखा अनुभव घेतला. या दिवशी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सहावीच्या वर्गावर तासिकेनुसार अध्यापन केले.आजच्या स्वयंशासन दिनी मुख्याध्यापक म्हणून श्रेया काळे हिने जबाबदारी सांभाळली,तर उपमुख्याध्यापक म्हणून सुमित माने याने काम पाहिले. शिक्षकांच्या भूमिकेत कु. श्रेया डिकले,प्रांजली डिकले, स्वप्नाली डिकले,अक्षदा काळे, शक्ती चाळक,अक्षरा काळे, अक्षरा बनसोडे,अविष काळे, नैतिक काळे,रोहित डिकले,प्रणव काळे आणि विद्यासागर माने यांनी अध्यापनाचे काम केले. यावेळी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इडली,सांबर, जिलेबी व पापडाची मेजवानी दिली.रोज अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या जागी एक दिवस अध्यापन करताना विद्यार्थ्यांनी “आज खूप मज्जा आली” ते “सर, तुम्ही हे सगळं कसं सांभाळता?” अशा प्रतिक्रिया देत आपले अनुभव व्यक्त केले. मध्यान्ह भोजन कर्मचारी रुक्मिणी डिकले व मयुरी डिकले यांनी विशेष परिश्रम घेत चविष्ट व खुसखुशीत इडली-सांबर तयार केले. या उपक्रमामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने, सहशिक्षक संतोष मोहिते,सयाजी शिंदे,श्रीमती आशा पवार व रसिका आगरकर यांनी उत्तम समन्वय ठेवून स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या पुतळ्यास शिक्षण महर्षी महाविद्यालयात अभिवादन
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी
आढाळा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन;विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा