February 27, 2026

मातोळ्यात एनएमएमएसचा यशोत्सव;श्री माधवराव भोसले हायस्कूलचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण

  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित श्री माधवराव भोसले हायस्कूल,मातोळा येथील इयत्ता आठवीतील आठ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने पालकांसमवेत गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.
    संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास,विशेष सराव चाचण्या व मार्गदर्शन वर्गांच्या माध्यमातून ही उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभल्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे संचालक संजय भोसले,शालेय समितीचे अध्यक्ष डी.टी.भोसले, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अजित साळवे,पर्यवेक्षक डबे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एनएमएमएससारख्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवणे हे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल असून यामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रचिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.मातोळा परिसरात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
error: Content is protected !!