September 21, 2026

विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले.
    यावेळी मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
    या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    संस्थापक अध्यक्षांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार,मूल्ये व शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
error: Content is protected !!