लातूर-महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन च्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी महानायक,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती लातूर येथील कार्यालयात व बेघर निवारा केंद्रात फळे व खाऊचे वाटप करुन साजरी करण्यात आली. याविषयी सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संघटना प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करते त्याच बरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विविध उपक्रम राबवून साजरी करते. परंतु यावर्षी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करीत ही जयंती राजकीय पुढाऱ्यांना टाळून साजरी करण्यात आली. यात संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचा तसेच सर्व सामान्य नागरिकांना सोबत घेऊन मुख्य कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.त्यानंतर लातूर येथील बेघर निवारा येथे या निवाऱ्यास वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सत्कार करुन खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थापक सचिव सुफी सय्यद शमशोद्दीन, प्रदेशाध्यक्ष अनिसखान पठाण, मराठवाडा अध्यक्षा उषाताई धावारे, प्रदेश संघटक सिद्धार्थ कवठेकर, प्रदेश संघटक सुरेखा घोडके, जिल्हा संघटक राणी माळी-लोढा, आकाश कांबळे जिल्हा संघटकशहर, वैशाली रोकडे,नईमभाई शेख, सय्यद मुजीब, मोहम्मद सिद्दीकी, सय्यद अजहर,फैज शेख, ईत्यादि पदाधिकारी व सदस्य तसेच बेघर मधील बंधू भगिनी उपस्थित होते.
More Stories
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग
सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृंध्दिगत करावी – विश्वस्त विक्रम गोजमगुंडे
लातूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र.१६ (ड) मधून अपक्ष उमेदवार विनोद श्रीहरी कोल्हे मैदानात