मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण,रोजगार व आर्थिक स्थैर्य पोहोचावे,या उद्दात्त ध्येयाने रुजवलेली विचारधारा आजही मोहेकर परिवार व संस्थांच्या माध्यमातून जिवंत आहे.या विचारांची प्रभावी अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., मोहा ही संस्था अल्पावधीतच विश्वास,पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनली आहे. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोहेकर उद्योग समूहाने शिक्षणासोबतच स्वयंरोजगार व आर्थिक सबलीकरणाचा भक्कम पाया घातला आहे.या समूहातील अभ्यासू,संयमी व कार्यक्षम नेतृत्व म्हणून हनुमंत (तात्या) मडके यांनी संस्थेला शिस्तबद्ध,लोकाभिमुख आणि प्रगत दिशेने नेले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली मोहेकर मल्टीस्टेट बँक केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था न राहता समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली आहे. परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ,शेतकरी व लघुउद्योगांना विश्वासार्ह सेवा,तसेच सामान्य नागरिकांना सुलभ व पारदर्शक व्यवहार उपलब्ध करून देत ही संस्था आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे.संस्थेच्या प्रत्येक उपक्रमामागे सेवा हाच धर्म हा मूलमंत्र प्रकर्षाने दिसून येतो. या गौरवशाली संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल (बाबा) मडके यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि.२१ जानेवारी २०२६,वार बुधवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेले सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते विशाल (बाबा) मडके त्यांना अंक देवून कार्यकर्तृत्व सन्मान प्रदान करण्यात आला.हा सन्मान प्रत्यक्षात संपूर्ण संस्थेच्या कार्याचा गौरव ठरला. यावेळी संगीता मुळे,सुरज मडके, अतुल मडके आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी मोहेकर मल्टीस्टेट बँकेच्या सामाजिक जाणिवेचे, संस्थात्मक शिस्तीचे व लोकहितकारी कार्याचे विशेष कौतुक केले. आज शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या विचारांचे वारसदार म्हणून मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.,मोहा ही संस्था समाजातील विश्वासाचे केंद्रबिंदू बनत असून,भविष्यातही समाजोन्नतीच्या कार्यात अग्रस्थानी राहील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन