February 8, 2026

संस्काराच्या शिदोरीतून महान व्यकिमत्व आकारास येतात – इंद्रजित देशमुख

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल,ट्रस्टचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित पूज्य ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले.
    यावेळी इंद्रजित देशमुख म्हणाले,छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज,शहीद भगतसिंग,स्वामी विवेकानंद शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी हे व्यक्तिमत्व त्यांच्या आई-वडिलांच्या संस्कारातून पुढे आल्या,हाच वारसा चालवण्याची आजच्या काळातील पालकांची भूमिका महत्वाची आहे. मुलांनी देखील आपल्या आईवडिलांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून वाटचाल करावी.संस्काराच्या शिदोरीतून महान व्यक्तिमत्व आकारास येतात.असे विविध दाखले देऊन हर्दयस्पर्शी व्याख्यान दिले.
    यावेळी व्यासपीठावर डॉ.अशोकराव मोहेकर ( शि.म.ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट,कळंब) रो.डॉ.अभिजीत जाधवर (अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी) रो.संजय सावंत (चेअरमन, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी),डॉ. हेमंत भगवान (प्राचार्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब) रो.अरविंद शिंदे (अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी)
    रो.शाम जाधवर (सचिव,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
    व्याख्यानमालेची सुरुवात संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.दादाराव गुंडरे,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी तर उपस्थितांचे आभार रो शाम जाधवर यांनी मांडले.
    यावेळी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव, जयंत भोसले, प्रा.विलास आडसुळ,प्रा.काकडे, प्रा.करंजकर,प्रा.सुनील भिसे,तसेच विविध प्रशालेतील शिक्षक वृंद प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
    प्रबंधक हनुमंत जाधव,संतोष मोरे, विनोद खरात,अरुण मुंडे यांनी सहकार्य केले.यावेळी बहुसंख्यने विविध प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!